आई कुठे काय करते : रुपाली भोसले हिला एकेकाळी राहावं लागलं होतं गोठ्यात!

पुढारी ऑनलाईन डेस्क : रुपाली भोसले ही आई कुठे काय करते या मालिकेतून घराघरात पोहोचली. रुपाली भोसले हिने त्याआधी बिग बॉस मराठी दुसऱ्या सीझनमधून लोकप्रियता मिळवली. रुपाली टीव्ही मालिकेतील लोकप्रिय चेहरा ठरला आहे. पण, तिचा अभिनयातील प्रवास तितका सोपा नाहीये.
अधिक वाचा –
- मी होणार सुपरस्टार : अंकुश चौधरी-संस्कृती बालगुडे एकत्र दिसणार
- एक स्त्री राहणार दोन प्रियकरांसोबत? ‘सोप्पं नसतं काही’
तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहायला आले आहेत. तिच्या जीवनात अशा अनेक दु:खद घटना घडल्या आहेत. तिने तिच्या आयुष्यात आलेले अनुभव स्वप्निल जोशीच्या ‘शेअर विथ स्वप्नील’ या रेडिओ शोमध्ये सांगितले. तिने तिच्या आयुष्यात घडलेले कटू अनुभववही सांगितले. तर मग, जाणून घेऊया रुपालीविषयी.
अधिक वाचा –
रुपाली एका पेक्षा एक या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. रुपाली सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती यांचा संसार मोडणाऱ्या संजनाची व्यक्तिरेखा तिने साकारली आहे.
अभिनय क्षेत्रात काम करता करता तिने आज यशाचे उंच शिखर गाठले आहे. पण, एकेकाळी तिला आणि तिच्या कुटुंबीयांना अक्षरश: जनावरे बांधण्याच्या ठिकाणी राहवं लागलं होतं.
अधिक वाचा –
बिग बॉसमध्ये आल्यानंतर रुपाली आणि पराग यांच्या नात्याची खूप चर्चा झाली.रुपालीचे लग्न लंडनस्थित आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तिसोबत झाले होते; पण काही कारणास्तव ती दाेघे वेगळी झाली. बिग बॉस संपल्यानंतर रुपालीने तिचा खास मित्र अंकीत मगरेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. तिने अंकितसोबतचे काही फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
…आणि आयुष्य उद्ध्वस्त झालं
रूपालीचा जन्म मुंबईत झाला होता. वरळीच्या बीडीडी चाळीत रूपालीचं बालपण गेलं होतं. रूपालीला खूप शिकायचे होते. पण, नियतीच्या मनात मात्र काही वेगळचं होतं. रुपाली नववीमध्ये शिकत होती. अचानक तिचे काका घरी आले. आणि एका स्कीमच्या नावाखाली तिच्या वडिलांकडून सर्व पैसे घेऊन गेले. पण, या स्कीममध्ये तिच्या काकाला अटक झाली होती. पण, दुसरीकडे मात्र रुपाली आणि तिचे कुटुंबीय रस्त्यावर आले.
दोन वेळच्या खाण्याची भ्रांत, सगळा पैसा गेला. अशावेळी रुपालीला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पुढे त्यांनी खूपचं बिकट परिस्थिती झाली.
काकीनेही दिला धोका
परिस्थिती फारचं दयनीय झाल्यामुळे तिच्या काकीने तिला घर विकून तिच्याकडे येऊन राहण्याचा सल्ला दिला होता. स्वत:ची काकी आहे, म्हणून तिचे संपूर्ण कुटूंब घर विकून काकीकडे गेले. मात्र, काकीनेदेखील त्यांना धोका दिला. त्यांच्याकडील सर्व पैसे घेऊन त्यांना घराबाहेर काढलं.
भर पावसात रुपाली, तिचे आई-वडील आणि लहान भावाला घेऊन उभे राहिले. मुलं भिजू नयेत म्हणून आईने दोघांच्या डोक्यावर ताडपत्री धरली होती. रुपालीसाठी हा काळ इतका वाईट होता की, तिच्या आईला दाेनवेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला.

अन् राहायला लागलं गोठ्यात
भोसले कुटुंबीय रस्त्यावर आलेलं समजताचं तिच्या वडिलांच्या मित्रांनी त्यांच्या घरी नेलं.
पण, त्यांचं कुटुंब मोठं होतं. त्यामुळे राहायचं कुठं असा प्रश्न निर्माण झाला. एका रात्र कशीबशी काढली.
दुसऱ्या दिवशी त्याच मित्राच्या ओळखीने एक छोटी खोली मिळाली.
ती पत्र्याची खोली होती. पत्र्याला खूप सारी छिद्रे होती. त्यामुळे रुपालीला पहाटे ३ वाजता उठऊन आंघोळ करावी लागायची.
या पत्र्याच्या खोलीत पहिल्यांदा गुरे बांधली जायची.
रुपालीने सुमीत राघवनसोबत ‘बडी दूर से आये है’ या हिंदी मालिकेत काम केले.
ही मालिका खूप गाजली. तिने काही हिंदी मालिकाही केल्या आहेत.
पाहा व्हिडिओ –
View this post on Instagram
View this post on Instagram