

कंगना रणौतने मनालीमध्ये अतिशय सुंदर घर बांधलेले आहे. या घरातून हिमाच्छादित पर्वतशिखरांचे सुंदर द़ृश्य दिसते. आता तिने या आधुनिक पद्धतीच्या घराचा विस्तार करीत जवळच एक नवे पारंपरिक पद्धतीचे घरही बांधले आहे. या आलिशान घरासाठी नदीतील दगड, लाकूड, हिमाचली पेंटिंग, कशिदाकाम केलेल्या वस्तू, लाकडी कलाकुसर आदींचा वापर केला आहे. कंगनाने हे घरही अतिशय सुंदररीत्या सजवलेले आहे. तिने या घराचे काही फोटो सोशल मीडियात शेअर करून त्याबाबतची माहिती दिली.