Kamal Haasan Gifts : कमल हासनकडून दिग्दर्शक कनगराजला लेक्सस कार, सुर्याला रोलेक्स घड्याळ भेट

Kamal Haasan Gifts : कमल हासनकडून दिग्दर्शक कनगराजला लेक्सस कार, सुर्याला रोलेक्स घड्याळ भेट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या भारतीय सिनेसृष्टीवर दाक्षिणात्य सिनेमांनी गारुड घातले आहे. एकीकडे बॉलिवूडचे सिनेमे धडाधड आपटत असताना साऊथचे सिनेमांना मात्र प्रचंड यश मिळत आहे. सध्या बॉलिवूडमधील अक्षय कुमारचा सम्राट पृथ्वीराज चौहान आणि कंगना राणावतचा धाकड या सिनेमांनी पहिल्याच आठवड्यात मान टाकली. पण, सध्या कमल हासन (Kamal Haasan Gifts) याचा विक्रम (Vikram Movie) हा चित्रपट भारतासह विदेशातही धुमाकूळ घालतोय. यामुळे पुन्हा एकदा कमल हासनच्या स्टारडमची चर्चा सुरु झाली आहे. या यशाने कमल हासन भारावला असून त्याने चित्रपटातील सहकार्यांना अक्षरशा: बक्षीसांची खैरात करत सुटला आहे.

विक्रम चित्रपटाने पहिल्या तीनच दिवसात १०० कोटी कमावल्यानंतर खूश झालेल्या कमल हासनने (Kamal Haasan Gifts) आपल्या सहकार्यांना गिफ्ट देण्याचा सपाटा लावला आहे. त्याने चित्रपटातील १३ सहाय्यक दिग्दर्शकांना आपाचे आरटीआर १६० ही बाईक दिली आहे. तर विक्रमचा दिग्दर्शक लोकेश कनकराज (Lokesh Kanagaraj) याला अत्यंत महागडी लेक्सस कार गिफ्ट दिली आहे. या कारची किंमत तब्बल ६१ लाखांहून पुढे आहे.

कमल हासन (Kamal Haasan Gifts) येवढ्यावरच थांबला नाही, तर या चित्रपटात फक्त पाच मिनिटांची पाहुणा कलाकार म्हणून भूमिका साकारणाऱ्या अभिनेता सुर्याला (Suriya) कमल हासन याने महागडे रोलेक्स घड्याळ भेट म्हणून दिले. या गिफ्टबाबत खुद्द सुर्या यानेच ट्वीट करत माहिती दिली. या चित्रपटात कमल हासन यांच्या शिवाय विजय सेतुपती (Vijay Sethupathi) आणि मल्याळम स्टार फहाद फासिल (Fahad Fazil) यांच्या ही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

प्रेक्षकांनी या चित्रपटातील सर्वांच्याच कामाचे कौतुक केले आहे. त्यामुळेच या सिनेमाला सर्वत्र भरघोस प्रतिसाद मिळत आहे. मंगळवार पर्यंत या सिनेमाने अमेरिकेत १५ कोटी, युकेमध्ये ५.१ कोटी, ऑस्ट्रेलियामध्ये ४.२१ कोटी आणि जर्मनीमध्ये ४४.४१ लाखांची कमाई केली आहे. शिवाय युएईमध्ये या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. केजीएफ २ नंतर सर्वाधिक कमाई 'विक्रम'ने केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news