

पणजी : प्रसिद्ध गायक मिका सिंग यांच्या हणजुणे (गोवा) येथील बंगल्याचे काम थांबविण्याचे आदेश पंचायतीने दिले आहेत. आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे हे बांधकाम थांबविण्याची नोटीस पंचायतीने दिल्याचे सरपंच सावियो आल्मेदा यांनी सांगितले. मिका याने बार्देश तालुक्यातील हणजुणे पंचायत क्षेत्रात बंगल्याचे बांधकाम सुरू केले आहे. भरती क्षेत्राच्या मर्यादेचा भंग करून बांधकाम केले असून सीआयरझेडच्या नियमांचेही उल्लंघन केल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.