ऐश्वर्याने फॅनला मारली मिठी अन्… | पुढारी

ऐश्वर्याने फॅनला मारली मिठी अन्...

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऐश्वर्या राय बच्चन हिची जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये गणना केली जाते. पण ऐश्वर्याने अनेक वेळा सिद्ध केले आहे की ती केवळ चेहऱ्यानेच नाही तर मनानेही सुंदर आहे. सध्या ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ होती. आता ऐश्वर्याचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन एका फॅनला मिठी मारताना दिसत आहे.

सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. ती काही चाहत्यांना ऑटोग्राफ देते. मग एक माणूस त्याच्यासमोर हात पुढे करतो आणि मिठीसाठी हावभाव करतो आणि ऐश्वर्या त्याला मिठी मारते. हे पाहून इतर फॅन त्या व्यक्तीला भाग्यवान म्हणताना दिसत आहेत. व्हिडिओमधील फॅन मोरोक्कोचा असल्याचे ऐकू येतो.

त्या फॅनने ऐश्वर्याला मोरोक्को येथे येण्याचे आमंत्रण दिले. व्हिडीओच्या शेवटी ऐश्वर्याने सर्वांना नमस्कार केला आणि निघून गेली. ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनसोबत दोन दिवस सहभागी झाली होती. .

Back to top button