पूजाच्या हातात सलमानचे ब्रेसलेट! | पुढारी

पूजाच्या हातात सलमानचे ब्रेसलेट!

पुढारी ऑनलाईन डेस्क

ही पूजा हेगडे कोण आहे हे माहितेय का? ‘मोहेंजोदडो’ मध्ये हृतिक रोशनची आणि ‘राधेश्याम’मध्ये ‘बाहुबली’ प्रभासची नायिका बनलेली ही दाक्षिणात्य अभिनेत्री. ‘हाऊसफुल्‍ल-4’ मध्ये तर तिने डबल रोल केला होता. तरीही तिला ओळखणारे आपल्याकडे किती जण आहेत हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, अर्थातच तिचा दक्षिणेत मोठाच चाहतावर्ग आहे. तामिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये ती एक आघाडीची अभिनेत्री आहे. अलीकडेच तिचा थलपती विजय याच्यासमवेत ‘बीस्ट’ हा चित्रपट येऊन गेला. आता ती सलमान खानची नायिका बनली आहे. सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियात लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोमध्ये तिने आपल्या हातात सलमान खानचे प्रसिद्ध ब—ेसलेट घातले असून कॅप्शनमध्ये तिने ‘शूटिंग सुरू’ असे म्हटले आहे. सलमानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटामध्ये ती त्याची नायिका झाली आहे. नुकताच या चित्रपटातील सलमानचा वेगळा लूकही व्हायरल झाला होता.

Back to top button