बॉलीवूडला मी परवडणार नाही : महेश बाबू | पुढारी

बॉलीवूडला मी परवडणार नाही : महेश बाबू

पुढारी ऑनलाईन डेस्क

तेलगू सुपरस्टार महेशबाबू आपण हिंदी चित्रपटांमध्ये काम करू इच्छित नाही असे नेहमीच सांगत असतो. मी तेलगू चित्रपटांमध्येच खुश आहे, असे त्याचे म्हणणे. महेशबाबूचा ‘सरकारू वारी पाटा’ हा चित्रपट 12 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्याने दिलेल्या एका मुलाखतीतही याबाबतचे आपले मत व्यक्त केले. ‘बॉलीवूड मला अफोर्ड करू शकत नाही’ असे त्याने म्हटले आहे. जे स्टारडम आणि आदर मला दक्षिणेत मिळालेला आहे, त्यामध्ये मी खुश आहे, असे त्याने सांगितले. त्यामुळे तेलगू चित्रपट सोडून बॉलीवूडकडे धावण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे त्याने म्हटले आहे.

Back to top button