पुढारी ऑनलाईन डेस्क
करिना कपूरनेही आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. 'ओटीटी'वरील आपल्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग तिने सुरू केले असून दार्जिलिंगमधील आपले काही फोटोही तिने सोशल मीडियात शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवरील फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की 'पहिला दिवस…कालिम्पोंग…द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स'. याबरोबर तिने दिग्दर्शक सुजॉय घोषला टॅग केले आहे. या फोटोत खुर्चीवर बसलेली करिना हातात आरसा घेऊन आपली हेअरस्टाईल ठीक करीत असताना दिसत आहे. समोर दार्जिलिंगचा नयनरम्य निसर्ग दिसत आहे. तिच्या या पहिल्या वेब चित्रपटाचे शूटिंग सिक्कीमच्या गंगटोकमध्येही होणार आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय जयदीप अहलावत आणि विजय वर्माही आहेत. करिनाचा आमीर खानसमवेतचा 'लाल सिंग चढ्ढा' हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.