Prarthana Behere : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून ‘नेहा’ने घेतला ब्रेक, 'हे' आहे कारण | पुढारी

Prarthana Behere : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून ‘नेहा’ने घेतला ब्रेक, 'हे' आहे कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या घराघरात लोकप्रिय झाली आहे. यामध्ये असणारी नेहा आणि यश ही जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे.  या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता श्रेयश तळपदे हे नेहा आणि यश या मुख्य भूमिकेत आहेत. परंतु, या मालिकेत नेहाची भूमिका साकारणारी प्रार्थना ही लंडनला जात असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मालिकेत दिसणार नाही. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे म्हणजेच मालिकेतील नेहा ही तिच्या खऱ्या आयुष्यातील लंडनवारी करत आहे. प्रार्थना तिच्या रिअल लाईफमधील पतीसोबत सध्या लंडनमध्ये आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर करत ही माहिती दिली आहे.

लंडन वारीमुळे शूटिंगला ब्रेक!

‘माझी तुझी रेशीमगाठी’ मालिकेतील नेहा पुढचे काही दिवस दिसणार नाही, हे समजताच सध्या प्रेक्षक आणि तिचे चाहते निराश झाले आहेत. सध्या प्रार्थना आणि तिचा नवरा अभिषेक हे लंडन वारीचा आनंद लुटत आहेत. मात्र ती लंडन वारीची प्रत्येक झलक प्रेक्षकांसोबत शेअर करत, तिच्या चाहत्यांना अपडेट्स देत आहे. दरम्यान तिने शेअर केलेल्या एक व्हिडीओत ती विमानाने प्रवास करताना दिसते. हा व्हिडीओ तिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिलादेखील टॅग केला आहे.

लंडनवारीचे हे आहे खास कारण!

प्रर्थानाने शेअर केलेल्या तिच्या व्हिडीओत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला टॅग करत, ‘आम्ही लवकरच येतोय’ असं म्हटलं आहे. कारण सोनाली कुलकर्णी हि देखील सध्या लंडनमध्ये असून, पुन्हा एकदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. लॉकडाऊन दरम्यान लग्नगाठ बांधलेल्या सोनालीच्या लग्नात कुणीही उपस्थित राहू शकलं नव्हतं. त्यामुळेच लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं औचित्य साधत ती पुन्हा एकदा सर्वांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात सात फेरे घेणार आहे. या लग्नसोहळ्यासाठीच प्रार्थना लंडनला गेली असल्याचा चाहत्यांनी अंदाज बांधला आहे. तर दुसरीकडे सोनाली कुलकर्णी हिच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना  धुमधडाक्यात सुरुवात देखील झाली आहे.

Back to top button