nora fatehi : नोरा पडली टेरेन्सच्या प्रेमात?

पुढारी ऑनलाईन
एक अफलातून नर्तकी आणि अभिनेत्री नोरा फतेही सध्या प्रेमात पडली असल्याची चर्चा आहे. कोरिओग्राफर ते गायक असा प्रवास केलेल्या टेरेन्स लेविस याच्या प्रेमात ती असल्याचे म्हटले जात आहे. हे दोघे ‘इंडियाज बेस्ट डान्सर सिझन-2’चे जजही होते. त्यावेळी दोघांमधील ‘केमिस्ट्री’ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. इन्स्टाग्रामवर दोघांनी एकत्रितपणे केलेले रिल्सही लोकप्रिय झाले होते. आता हे दोघे एकमेकांना डेट करीत असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत टेरेन्सने सांगितले की ‘सच बोलूं तो मैने कई बार लोगोंका दिल तोडा है, कमिटमेंट फोबिया हूँ. मला वाटते की खरे प्रेम हे बंधनमुक्त असावे. नोराबाबत बोलायचे तर ‘राज की बात राज रहने दो!’