

पुढारी ऑनलाईन
कंगना रणौतचा आगामी चित्रपट 'धाकड'मधील पहिले गाणे 'शी इज ऑन फायर' 5 मे रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. त्याची माहिती ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. त्यांनी या गाण्याचा प्रोमोही शेअर केला आहे.
त्यामध्ये कंगना सात वेगवेगळ्या रूपात दिसून येते. कंगनाशिवाय यामध्ये अर्जुन रामपालही दिसून येतो. हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात कंगनाने एजंट अवनीची भूमिका साकारली आहे. एका 'ह्यूमन ट्रॅफिकर'ला म्हणजेच मानवी तस्करी करणार्या गुन्हेगाराला शोधण्याच्या मोहिमेवर असलेल्या एजंटची ही भूमिका आहे. दरम्यान, सलमान खानची लाडकी बहीण अर्पिता व तिचा पती आयुष शर्मा यांनी दिलेल्या ईदच्या पार्टीत कंगनाने हजेरी लावली. तिचे पार्टीत येत असतानाचे फोटो आणि व्हिडीओही सर्वत्र झळकले.