Shivani Wed : लग्नमंडपाच्या तयारीपासून अक्षतापर्यंतचा स्पेशल व्हिडिओ | पुढारी

Shivani Wed : लग्नमंडपाच्या तयारीपासून अक्षतापर्यंतचा स्पेशल व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन डेस्क

छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना?’ मालिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Wed) अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर विवाहबंधनात अडकले. विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस आणि शिवानीच्या विवाहाचे विधी 1 मे पासून सुरू झाले होते.

विराजसने दिग्दर्शित केलेल्या ‘डावीकडून चौथी बिल्डिंग’ या नाटकात शिवानीने (Shivani Wed) अभिनय केला होता. तिथेच दोघांची ओळख झाली होती. याचवर्षी जानेवारीत दोघांनी एक फोटो शेअर करून आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Rangole (@rangshivani)

त्यांच्या लग्नाच्या सोहळ्याच्या तयारीपासून अक्षदा पडेपर्यंत व्हिडिओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shivani Rangole (@rangshivani)

Back to top button