Emraan Hashmi : इम्रान हाश्मीने सलमानसाठी आपला २० वर्षांचा नियम मोडला !

Emraan Hashmi : इम्रान हाश्मीने सलमानसाठी आपला २० वर्षांचा नियम मोडला !
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) या अभिनेत्याला बॉलिवूडमधील रंगीबेरंगी पार्ट्यांमध्ये सहभागी होण्यासाठी नाही तर चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारा एक गुणी अभिनेता म्हणून ओळखले जाते. आतापर्यंतच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत इम्रान हाश्मीने कधीही बॉलिवूडच्या कोणत्याही पार्टीत भाग घेतला नाही. त्याने फक्त आणि फक्त आपल्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित केले. पण, यावेळी इम्रानने अपवाद म्हणून एका भव्य बॉलीवूड पार्टीला उपस्थित राहून त्याचा पुरेपूर आनंद लुटला. आम्ही ज्या पार्टीबद्दल बोलत आहोत ती इतर कोणाची पार्टी नसून मंगळवारी सलमान खानची (salaman khan) ग्लॅमरस ईद पार्टी होती. सलमानचा मेहुणा आयुष शर्मा आणि बहीण अर्पिता शर्मा यांनी मुंबईतील खार येथील त्यांच्या आलिशान घरात या पार्टीचे आयोजन केले होते.

या पार्टीत इम्रान हाश्मीने इतर बॉलिवूड स्टार्ससोबत खूप धमाल केली. येथे तो सलमान खान, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, कंगना राणौत, जॅकलीन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा, करण जोहर, सुष्मिता सेन, हुमा कुरेशी, अनिल कपूर, सुनील शेट्टी यांसारख्या अनेक स्टार्सना भेटला. इम्रानने यापैकी अनेक स्टार्ससोबतही काम केले आहे. शेवटी, असे काय घडले की इम्रान हाश्मीने स्वतःचा २० वर्षांपासून पाळत असलेला नियम मोडून सलमानच्या ईद पार्टीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला ?

फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, इम्रान हाश्मी पार्टी करण्यावर विश्वास ठेवत नाही असे नाही. इम्रान नेहमीच कामावर लक्ष केंद्रित करण्यावर विश्वास ठेवतो. सुरुवातीपासूनच त्याचा विश्वास आहे की आपले कामच आपली ओळख असेल आणि बनवेल. ना की कोणत्याही पार्टीत जाऊन स्वतःची ओळख आणि पब्लीसिटी करावी. त्याने बनवलेला हा नियम इम्रानने नेहमीच पाळला आहे.

या संदर्भात सूत्राने पुढे सांगितले की, 'यावेळी सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांकडून ईद पार्टीत सहभागी होण्याचे आमंत्रण आले, तेव्हा इम्रानने लगेच आमंत्रण स्वीकारले आणि पार्टीत सहभागी होण्यास होकार दिला. अशा परिस्थितीत इम्रानने कामाच्या दरम्यान आपल्या सभोवतालचे वातावरण हलके करत थोडी मजा करण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे या ईद पार्टीत इम्रान हाश्मी कोणत्याही भडक स्टाईलमध्ये दिसला नाही, पण या सेलिब्रेशनला हजर राहण्यासाठी इम्रानने अतिशय सौम्य शैलीची कपड्यांची निवड केली. यशराज फिल्म्स निर्मित टायगर ३ या मोठ्या चित्रपटात सलमान खानसोबत इम्रान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

याआधी इम्रान हाश्मीने यशराज फिल्म्सच्या कोणत्याही चित्रपटात किंवा सलमान खानसोबत काम केलेले नाही. मात्र, यशराज फिल्म्सने इम्रान हाश्मीच्या या चित्रपटात काम करण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. टायगर ३ व्यतिरिक्त, करण जोहरची कंपनी धर्मा प्रॉडक्शन निर्मित सेल्फी या चित्रपटात इम्रान हाश्मी अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news