कियारा : ‘प्रीती’ने केले ‘कबीर’चे कौतुक | पुढारी

कियारा : ‘प्रीती’ने केले ‘कबीर’चे कौतुक

पुढारी ऑनलाईन डेस्क

शाहिद कपूरचा ‘जर्सी’ पाहिल्यावर कियारा अडवाणीने त्याचे कौतुक करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘माय डियर एसके, तू खूप खास आहेस. तुला अर्जुनच्या भूमिकेत पाहणे मॅजिकपेक्षा कमी नाही. माझ्याकडून संपूर्ण टीमला शुभेच्छा!’ त्यावर शाहिदनेही तिला ‘कबीर सिंग’ स्टाईलने उत्तर दिले. त्याने लिहिले, ‘माझी प्रिय प्रीती, तुझे शब्द नेहमीच कबीरच्या हृदयात असतील, तू मेरी बंदी है!’ ‘कबीर सिंग’ सुपरहिट झाल्यावर त्याचा कबीर आणि कियाराची ‘प्रीती’ही गाजली होती. आता दोघांनी याच आठवणी जागवल्या आहेत.

Back to top button