vivek agnihotri : आता विवेक बनवणार ‘दिल्‍ली फाईल्स’! | पुढारी

vivek agnihotri : आता विवेक बनवणार ‘दिल्‍ली फाईल्स’!

पुढारी ऑनलाईन

‘द ताश्कंद फाईल्स’ व ‘द कश्मीर फाईल्स’नंतर आता दिग्दर्शक विवेक अग्‍निहोत्री 1984 च्या दिल्‍लीतील दंगली व शिखांच्या हत्याकांडावर ‘दिल्‍ली फाईल्स’ हा चित्रपट बनवणार आहेत. त्यांनी सांगितले, हा चित्रपट 1984 च्या काळ्या अध्यायावर आधारित असेल. यामध्ये तामिळनाडूशी संबंधित सत्यही दाखवले जाईल. या दंगलीत अनेक निरपराधांचे बळी गेले; पण ते लपवले गेले. या लोकांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही, यापेक्षा वाईट काय असू शकते. त्यामुळेच इतिहासातील वस्तुस्थिती लोकांना सांगितली तर ते स्वतःची बाजूही मांडतील आणि न्यायाची मागणीही करतील.

Back to top button