

पुढारी ऑनलाईन
दिशा पटानीने 'धोनी','बागी-2' सारख्या काही चित्रपटांमधून आपला एक चाहतावर्ग निर्माण केलेला आहे. खरे तर तिच्या अनेक भूमिका 'संयत' आणि दुःखाची किनार असलेल्याच होत्या. मात्र, ती इन्स्टाग्रामवर जी छायाचित्रे शेअर करीत असते ती तिच्या पडद्यावरील इमेजपेक्षा वेगळी असतात. अनेकवेळा ती बिकिनीमधील आपले फोटो शेअर करते. आताही तिने इन्स्टाग्रामवर बीचवरील बिकिनीतील काही हॉट फोटो शेअर केले आहेत. ती नेमक्या कोणत्या बीचवर गेली होती हे कळण्यास मार्ग नसला तरी तिच्या या फोटोंची चर्चा मात्र होत आहे.
किनार्यावरील मऊ रेतीत किंवा बीचवरील तंबूत बसून तिने वेगवेगळ्या प्रकारच्या बिकिनींमधील टिपलेले आपले हे फोटो शेअर केले आहेत. दिशाच्या चित्रपटांबाबत बोलायचे तर गेल्यावर्षी ती सलमान खानबरोबर 'राधे'मध्ये दिसली होती. आता तिचे 'एक व्हिलन रिटर्न्स' आणि 'योद्धा'सारखे काही चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत.