द कश्मीर फाईल्स : ”काश्मिरी पंडितांच्या हातात शस्त्र द्या अशी बाळासाहेबांची भूमिका होती” | पुढारी

द कश्मीर फाईल्स : ''काश्मिरी पंडितांच्या हातात शस्त्र द्या अशी बाळासाहेबांची भूमिका होती''

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

काश्मीरचं सत्य दडपण्याचा प्रयत्न झाला. जे घडलं ते सत्य दाबलं गेलं. ते कधीचं बाहेर आलं नाही. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द कश्मीर फाईल्स चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिलीय. ”काश्मिरी पंडितांच्या हातात शस्त्र द्या अशी बाळासाहेबांची भूमिका होती. त्यावेळी बाकी सगळे अतिरेक्यांच्या भीतीने गप्प होते. पण आता ३२ वर्षांनी काश्मिरच्या पंडिताची आठवण का आली.?” असा सवाल राऊत यांनी दिल्लीत बोलताना केला आहे. पंतप्रधान मोदी चित्रपटाचे प्रचारक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून द काश्मीर चित्रपटाचा वापर केला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. काश्मीरच्या वेदना शिवसेनेला माहित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या होत असलेल्या विविध चौकशांच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी, महाविकास आघाडी नेत्यांच्या जैव्हा चौकश्या होत्यात तेव्हा भाजप नेत्यांना गुदगुल्या होतात, असा टोला लगावला आहे. राज्यपालांकडून वारंवार घटनेचे उल्लंघन होत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.

‘द कश्मीर फाईल्स’ रिलीज झाल्यानंतर तो देशभरात चर्चेत आलाय. चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाची आणि खोऱ्यातून त्यांच्या पलायनाच्या वेदना, दु:ख चित्रित केल्या आहेत.

दरम्यान, नेहमी चर्चेत राहणारी बॉलिवूड ड्रामा क्वीन कंगना राणावतने देखील हा चित्रपट पाहिला. कंगनाने चित्रपटाचे कौतुक केलं आहे. द काश्मीर फाईल्स हा वर्षातील पहिला यशस्वी बॉलीवूड हीट आहे असे सांगून तिने आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’वर टीका केली. कंगनाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ती म्हणते की हा खूप चांगल्या दर्जाचा चित्रपट आहे आणि बॉलिवूडची सर्व पापे धुवून टाकण्यात तो यशस्वी ठरला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भारतात स्त्रियांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज : डॉ. निहारिका प्रभू | #SkinCareTreatment

Back to top button