Genelia D’Souza : जेनेलियाचे फोटो पाहताच चाहते म्हणाले…

Genelia D’Souza : जेनेलियाचे फोटो पाहताच चाहते म्हणाले…

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिबूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजाने तिच्या इंन्स्टाग्रामवर लेहेंग्यात नवीन हेअरकटमधील फोटो शेअर केला आहे.  हा फोटो पाहताच तिच्या चाहत्यांनी जेनेलियाला 'बार्बी डॉल' असा उल्लेख केला आहे. तिच्या पुनरागमनाने चाहते खूपच आनंदी झाले आहेत. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री जेनेलियाने इंन्स्टाग्रामवर विविध पोजमधील तीन फोटो शेअर केले आहेत, यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. ती पुन्हा एकदा दक्षिणात्य चित्रपटातून पडद्यावर येत असल्याचे तिने या फोटोंसोबत दिलेल्या संदेशात सांगितले आहे.

अभिनेत्री जेनेलिया डिसूजा आपल्या संदेशात म्हणते की, "आज माझा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पुन: प्रवेश होत आहे. अद्याप शीर्षक नसलेल्या चित्रपटासाठी माझा विचार केल्याबद्दल, मी दिग्दर्शन राधा कृष्ण रेड्डी, साई कोरार्पतींचे आभार मानते. तसेच, या चित्रपटातील मुख्य भूमिका असलेला, कर्नाटकचे माजी मंत्री आणि लोकप्रिय उद्योगपती गली जनार्दन रेड्डी यांचा मुलगा अभिनेता किरीती याला दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबद्दल शुभेच्छाही तिने दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

जेनेलिया डिसूझाने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यामध्ये ती बॉलिबूड अभिनेत्रा रितेश देशमुखसोबत दिसली होती. इथून दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. लग्नानंतर जेनेलियाने चित्रपटांपासून दूर राहणे पसंत केले होते. ती बरेच वर्षे कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही.

 व्हिडिओ पाहा :

हेही वाचलत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news