एसआयटीच्या तपासात आर्यन खानविरोधात पुरावे नाहीत ? | पुढारी

एसआयटीच्या तपासात आर्यन खानविरोधात पुरावे नाहीत ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील कार्डिलिया क्रुझ ड्रग्ज केस प्रकरणी तपास करत असलेल्या एनसीबीच्या एसआयटीने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानविरोधात ड्रग्ज नसल्याचा निष्कर्ष काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तत्कालीन एनसीबी संचालक समीर वानखेडे पुन्हा एकदा अडचणीत शक्यता आहे. दरम्यान, आर्यनचा या प्रकरणात संबंध नसल्याचे समोर येऊ लागल्यानंतर मुंबई एनसीबीकडून खुलासा करण्यात आला आहे.

एनसीबीचे DDG संजय सिंह यांनी दाव्याचे खंडन करताना म्हटले आहे की, आर्यन खान प्रकरणात कोणतेही पुरावे नाहीत हा चिंतेचा मुद्दा आहे. यामध्ये काही तथ्य नसून हे सर्व अंदाज असून बाकी काही नाही. या दाव्यांवर एनसीबीकडून खुलासा घेण्यात आलेला नाही. चौकशी अजूनही पूर्ण झालेली नाही. या टप्प्यावर काहीच सांगू शकत नाही. आताच काही मत व्यक्त करणे आततायीपणाचे ठरेल.

आर्यन खानजवळ ड्रग्ज आढळलेच नव्हते, त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे चॅट्स तपासण्याची गरज नव्हती, असं एसआयटीकडून सांगण्यात आल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे 26 दिवसांच्या कोठडीनंतर, मुंबई उच्च न्यायालयाने त्याला 28 ऑक्टोबर रोजी आर्यनला जामीन मंजूर केला. 30 ऑक्टोबर रोजी तो तुरुंगातून बाहेर आला.

एसआयटीने त्यांच्या तपासादरम्यान छापेमारीत काही महत्त्वाच्या बाबी उघड झाल्याचा दावा केला होता.

अटक करण्यात आलेल्या आर्यन, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्या व्हॉट्सऍप चॅटमध्ये काहीही आक्षेपार्ह आढळले नाही, असे न्यायालयाने नमूद केले होते. दरम्यान, एसआयटीचा अंतिम अहवाल हा दोन महिन्यांत एनसीबीचे महासंचालक एस.एन. प्रधान यांना सादर केला जाणार आहे. यामुळे चर्चेचा विषय असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button