आई मायेचं कवच : सुहानीला शोधण्यासाठी आईचा यो-यो लूक | पुढारी

आई मायेचं कवच : सुहानीला शोधण्यासाठी आईचा यो-यो लूक

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील ‘आई मायेचं कवच’ ही मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे. ही मालिका एका वेगळ्या वळणावर येवून पोहोचली आहे. यात जन्मदात्या आईवर विश्‍वास न ठेवता सुहानीला बाहेरचे जग प्रिय वाटल्याने ती घराबाहेर पडते. परंतु, नकळत सुहानीवर अनेक संकटे ओढवतात. या ओढवलेल्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मिनाक्षी अतोनात प्रयत्न करत आहे. यासाठी तिने आपला लूक बदलला आहे. यालूकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे.

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला आईचं प्रेम कळत नाही किंवा कळून देखील आपण न कळल्याचा आव आणत असतो. कारण, आपल्याला आपलं स्वातंत्र्य त्यापुढे अधिक महत्वाचं वाटत असतं. लेकरू कुठे वाट चुकले तर पुन्हा एकदा मार्गावर आणणारी ही आईच असते हे आपण विसरतो. असंच काहीसं ‘आई मायेचं कवच’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. मालिकेत सुहानीसोबत असंच घडताना दिसत आहे.

जन्मदात्या आईवर विश्वास न ठेवता सुहानीला बाहेरच जग प्रिय होतं. पण सुहानीच्या नकळत तिच्यावर ओढवलेल्या संकटातून तिला बाहेर काढण्यासाठी आईचा मात्र कस लागतो. वाट चुकलेल्या मुलीला परत सुखरूप घरी आणण्यासाठी मीनाक्षी जीवाचं रान करते आहे. अनेक पुरावे हाती लागून सुध्दा सुहानी मिळत नाही. बर्‍याचदा जवळचा माणूसच संशयित म्हणून समोर येतात त्याक्षणी देखील मिनाक्षी धीर न सोडता त्याला सामोरी जाताना दिसतं आहे. याच दरम्यान मालिकेने नवं वळण घेतले आहे. कारण मिनाक्षी सुहानीला शोधण्यासाठी नव्या लुकमध्ये दिसणार आहे. मीनाक्षा म्हणजे, भार्गवी चिरमुलेने मुलीला शोधण्यासाठी जीन्स, टीशर्ट व नाकात बाली अशा लूकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बेपत्ता असलेल्या सुहानीच्या शोधात असताना तिला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आहे. आता मीनाक्षी सुहानीपर्यंत कशी पोहोचेल ? लोखंडे आणि मीनाक्षी मिळून सुहानीला कसे सोडवणार ? सुहानीपर्यंत पोहोचण्याचा मीनाक्षीला मार्ग सापडणार का ? असे अनेक प्रश्न चाहत्यांनी पडले आहेत. त्यामुळे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याआधी भार्गवीला साडी, ड्रेस अशा लूकमध्ये चाहत्यांनी पाहिले आहे. परंतु, तिच्या या नव्या यो-यो लूकने चाहते भारावून गेले आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button