ब्लॅक विडो फेम स्कार्लेट सर्वाधिक कमाई करणारी हॉलीवूड अभिनेत्री | पुढारी

ब्लॅक विडो फेम स्कार्लेट सर्वाधिक कमाई करणारी हॉलीवूड अभिनेत्री

पुढारी ऑनलाईन

36 वर्षीय स्कार्लेट 2018 नंतर सर्वाधिक कमाई करणार्‍या नायिकांच्या यादीत टॉपवर आली आहे. स्कार्लेटची मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील ‘नताशा रोमोनॉफ ऊर्फ ब्लॅक विडो’ या भूमिकेने गेल्या दहा वर्षांत तिला मोठी प्रसिद्धी दिली.

तिने या काळात 56 मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 461 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सोफिया व्हगारा
हॉलीवूडमधी एक टॅलेंटेड अभिनेत्री, निर्माती आणि सादरकर्ती सोफिया व्हगारा या यादीत दुसर्‍या स्थानी आहे. ‘अमेरिकाज् गॉट टॅलेंट’ या शोची ती जज्ज आहे. विविध ब्रँडस्, गुंतवणुकीतून तिने या वर्षात 43 मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 323 कोटी रुपयांची कमाई केली.

अँजेलिना जोली
अभिनेत्री अँजेलिना जोली गतवर्षी ‘इटर्नल्स’मध्ये दिसली होती. तिची त्या वर्षीची कमाई 267 कोटी रुपये इतकी आहे.

रीज विदरस्पून
गोल्डन ग्लोब अ‍ॅवॉर्ड विजेती अभिनेत्री रीज विदरस्पून या वर्षात 35 मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे 263 कोटी रुपये कमावले. रीज 90 च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

गॅल गॅडॉट

18 व्या वर्षी ‘मिस इस्रायल’चा किताब जिंकणारी अभिनेत्री गॅल गॅडॉट गतवर्षी ‘वंडर वूमन 1984’मुळे चर्चेत होती. यावर्षीही तिचा ‘डेथ ऑन द नाईल’ प्रदर्शित होत आहे. तिने गतवर्षी 235 कोटी रुपयांची कमाई केली.

जेनिफर लॉरेन्स
‘हंगर गेम’ फिल्म फ्रँचाईझीची अभिनेत्री जेनिफर लॉरेन्सने गतवर्षात 215 कोटींची कमाई केली. जेनिफरचा यावर्षी ‘डोंट लूक अप’ हा फार्सिकल कॉमेडी चित्रपट नेटफ्लिक्सवर रीलिज झाला होता.

ज्युलिया रॉबर्टस्
तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकणारी यशस्वी अभिनेत्री ज्युलिया रॉबर्टस्ची 2021 या वर्षातील कमाई 30 मिलियन डॉलर्स म्हणजे 226 कोटी इतकी आहे. यावर्षी तिचा जॉर्ज क्‍लूनीसोबतचा ‘तिकीट टू पॅराडाईज’ चित्रपट रीलिज होत आहे.

Back to top button