

पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपिका पादुकोन, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी भूमिका साकारलेला गेहराईया हा चित्रपट प्रदर्शित झाला. अभिनेत्री कंगणा राणावतला गेहराईया या चित्रपटाबद्दल काय वाटतं? असा प्रश्न विचारल्यानंतर तिने चांगलेच फटकारले. गेहराईया हा चित्रपट सध्याच्या पिढीतील नाती कशी आहेत, या नात्यांतील गोंधळ यावर आधारित आहे. कंगणा राणावत हिने आता या चिटपटाची समीक्षा लिहिली आहे. या समीक्षेत कंगणाने गेहराईया या चित्रपटावर टीका केली आहे.
कंगणा राणावत ने काल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आ्रहे. ही स्टोरी मनोज कुमार आणि माला सिन्हा यांच्या चित्रपटातील 'चाद सी मेहबुबा हो मेरी' या गाण्याची आहे. सोबतच कंगणाने या स्टोरीला जोडून लिहले आहे की मला रोमान्स कसा असतो हे समजते आणि माहितीही आहे. कंगणाने तिच्या इस्टग्राम स्टोरीमध्ये गेहराईया या चित्रपटावर जोरदार टीका केली आहे.
कंगणाने म्हटले आहे की नव्या पिढींचे आयुष्य आणि शहरी जीवन दाखवण्याच्या नावाने रद्दी विकू नका. खराब चित्रपट हे खराबच असतात. गेहराईया मध्ये शरीरप्रदर्शन दाखवले आहे याने काही तुम्ही चित्रपटाला वाचवू शकणार नाही. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. कोरोनाचे निर्बंध असल्याने गेहराइया हा दीपिका पादुकोणचा चित्रपट ओटीटी प्लॅडफॉर्म अॅमॅझॉन प्राईम व्हिडीओ वरती प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचलतं का?