हृतिकने केले हुमाचे कौतुक | पुढारी

हृतिकने केले हुमाचे कौतुक

पुढारी ऑनलाईन

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून जेव्हा अभिनेत्री हुमा कुरेशीचे बॉलीवूडमध्ये पदार्पण झाले होते तेव्हापासून अनेकांची अवस्था ‘दिल हुमा हुमा करे’ अशी झाली होती. त्यानंतर हुमाला बॉलीवूडमध्ये खुप जास्त यश मिळाले आहे, असे नाही. किंबहुना हुमाने जास्त चित्रपट केलेले नसले तरी तिच्यावर प्रेम करणारा एक वर्ग निर्माण झाला असून तो तिच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतो.

अलीकडेच हुमा आणि अभिनेत्री भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दासानी यांच्या ‘मिथ्थ्या’ या सायकॉलॉजिकल थ्रिलर वेबसीरिजचा ट्रेलर रीलिज झाला आहे. यात हुमाची दमदार भूमिका दिसते. या ट्रेलरचे अभिनेता हृतिक रोशननेही कौतुक केले आहे. हृतिकने हुमासह संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. रोहन सिप्पीने या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. सहा भागांची ही सीरिज झी फाईव्ह या ओटीटीवर रीलिज होणार आहे.

Back to top button