पार्थ समथान करणार आलियासोबत पदार्पण | पुढारी

पार्थ समथान करणार आलियासोबत पदार्पण

पुढारी ऑनलाईन

टीव्ही मालिकांतील अभिनेता पार्थ समथान आता बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असून, अभिनेत्री आलिया भट्टसोबत त्याचा डेब्यू होणार असल्याने सध्या तो जाम खुशीत आहे. 15 फेब्रुवारीपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होत आहे. चित्रपटाबाबतचा बाकीचा तपशील लवकरच सर्वांसमोर ठेवू, असेही त्याने म्हटले आहे. पार्थचा चाहतावर्ग मोठा आहे. यापूर्वी पार्थने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले असून, गतवर्षी त्याची एक वेबसीरिजही ओटीटीवर रीरिज झाली आहे.

Back to top button