‘पृथ्वीराज’मधील मानुषीचा फर्स्ट लूक | पुढारी

‘पृथ्वीराज’मधील मानुषीचा फर्स्ट लूक

पुढारी ऑनलाईन

यशराज बॅनरच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटाची प्रदर्शनाची नवी तारीख निश्‍चित्त झाली असून 10 जून रोजी हा चित्रपट थिएटर्समध्ये येत आहे. या रीलीज डेटसोबतच चित्रपटातील अक्षयकुमार, मानुषी छिल्लर आणि संजय दत्त यांचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. अक्षयने पृथ्वीराज चौहान यांची तर मानुषीने राजकुमारी संयोगिता यांची भूमिका साकारली आहे. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित या चित्रपटातून मानुषी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटात सोनू सूदने महाकवी चंद बरदाई यांची भूमिका साकारली आहे. बरदाई यांनी ‘पृथ्वीराज रासो’ हा ग्रंथ लिहिला होता. संजय दत्त काका कन्हा ही भूमिका साकारत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar)

Back to top button