Teddy Day 2022 : तुमच्या प्रिय व्यक्तींला द्या ‘ही’ खास सरप्राइज

Teddy Day 2022 : तुमच्या प्रिय व्यक्तींला द्या ‘ही’ खास सरप्राइज
Published on
Updated on

व्हॅलेंटाईन वीक – डे3- टेडी डे (Teddy Day)

प्रेमीयुगलकांसाठी प्रेमाच्या या आठवड्यात प्रत्येक दिवस हा खास असतो. जो-तो आपआपल्यापरीने व्हॅलेंटाईन वीक साजरा करत असतो. आज या विकमधील डे3 (Teddy Day) म्हणजेच टेडी डे. हा दिवस प्रेमीयुगल, जोडप्यांसाठी अगदीच खास असतो , त्यामुळे हा दिवस सर्वानाच खास आणि अनोख्या पद्धतीने साजरा करायचा असतो.

टेडी डे (Teddy Day) ला लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला सुंदर टेडी गिफ्ट करून आपले प्रेम व्यक्त करून प्रेमची जाणीव करून देतात. टेडी डे' च्या निमित्ताने मित्र-मैत्रिणी, प्रेमीयुगल, नवरा-बायको, प्रियजन आणि इतर आवडीच्या व्यक्तीलाही त्यांच्या आवडीच्या रंगाचे टेडी बीयर गिफ्ट देऊन टेडी डे साजरा करू शकतात.

यावेळीचा टेडी डे (Teddy Day) आगळावेगळा आणि अनोख्या पद्धतीने साजरा करून, तुम्हाला तुम्हाच्या प्रेमातील विश्वास वाढवायचा आहे का? तर मग आवडत्या व्यक्तीला, त्याच्या आवडीच्या शेप, रंगातील टेडी बियर द्या. आणि यासोबतच तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी संदेश पाठवून आपलं प्रेम व्यक्त करू शकता. यामुळे तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या आयुष्यातला ताण हलका करण्यासाठी आजच्या दिवशी टेडी बीयर सोबत किमान एखादा मेसेज पाठवा आणि तुमच्या प्रिय व्यक्तींच्या दिवसाची सुरूवात त्यांच्या चेहर्‍यावर एक सुंदर स्माईल आणून करा.

टेडी बीयर सोबत पाठवा मेसेज आणि वाढवा नात्यातील विश्वास

माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू…
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू…
काय सांगू माझी क्यूट टेडी बियर आहेस तू…!
'टेडी डे'च्या शुभेच्छा !

तु सदैव हसत रहा,आनंदी रहा, खुश रहा,
मात्र सदैव टेडी बेअर सारखे माझ्या सोबत रहा
'टेडी डे'च्या शुभेच्छा !

टेडी बीअर दिसायला किती सुंदर वाटतात,
हृदयात एकाच क्षणात उतरुन जातात,
त्यांना पाहून तुझीच आठवण येते,
काय सांगू तुला तूच माझी टेडी बेअर वाटते
'टेडी डे'च्या शुभेच्छा !

जब भी तुम्हारी याद आती है,
तुम्हारे दिए टेडी को गले लगा लेती हूं।
'टेडी डे' की शुभकामनाएं !

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news