‘का रं देवा’ 11 फेब्रुवारीला रीलिज होणार | पुढारी

‘का रं देवा’ 11 फेब्रुवारीला रीलिज होणार

पुढारी ऑनलाईन

ग्रामीण पार्श्‍वभूमी असलेला व हृदयस्पर्शी प्रेमकथा असलेला ‘का रं देवा’ हा चित्रपट 11 फेब्रुवारीला रीलिज होत आहे. अभिनेत्री मोनालिसा बागल आणि अभिनेता मयूर लाड ही जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

चित्रपटात नागेश भोसले, अरुण नलावडे, जयवंत वाडकर यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजित जाधव यांचे आहे. आनंद शिंदे, आदर्श शिंदे, मधुर शिंदे, डॉ. नेहा राजपाल, सुप्रिया सोरटे यांनी चित्रपटाची गाणी गायली आहेत.

Back to top button