Aamir Khan याचा ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रीलीज - पुढारी

Aamir Khan याचा ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रीलीज

मुंबई; पुढारी ऑनलाईन : कोरोनाचे संक्रमण पुन्हा एकदा सुरु झाल्याने देशासह अनेक राज्यात कोरोनाचे निर्बंध वाढत चालले आहेत. अनेक ठिकाणी विकेंड लॉकडाऊन, रात्रीचे कर्फ्यु लागू आहे. तर आता तामिळनाडू सारखे राज्य संपूर्ण लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहे. नव्या वर्षात अनेक बीग बजेट चित्रपटे रीलीज होणार होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या रीलीज डेट पुढे ढकलल्या आहेत. आता अनेक दिवसांपासून प्रतिक्षा लागलेल्या अमिर खानच्या ( Aamir Khan )  ‘लालसिंग चड्ढा’ या चित्रपटाची रीलिज डेट निश्चित झाली असून त्यांनी निश्चीत केलेल्या तारखेला चित्रपट रीलिज होणार असल्याचे चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊसने सांगितले आहे.

बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून अमिर खान ( Aamir Khan ) याला ओळखले जाते. तो आपल्या चित्रपटावर परिपूर्ण कष्ट घेतो. त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर एक नवा उच्चांक निर्माण करतो. तो अगदी सवडीने आणि निवांत चित्रपट बनवतो पण, त्याच्या चाहत्यांना तो त्याच्या कलाकृतीतून सर्वोच्च आनंद देखिल देतो. यामुळे अमिर खानच्या चित्रपटाची प्रतिक्षा त्याच्या चाहत्यांनाच नव्हे तर सर्व सिनेरसिकांना असते.

अमिर खान ( Aamir Khan ) गेल्या काही दिवसांपासून आपल्या लालसिंग चड्ढा या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो लालसिंगची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. तर त्याच्यासोबत अभिनेत्री म्हणून करीना कपूर काम करत आहे. सध्या चित्रपटाचे संपूर्ण काम संपलेला असून हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. पण, कोरोनाच्या निर्बंधामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबद अनिश्चितता व्यक्त करण्यात येत होती.

अखेर लालसिंग चड्ढा हा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होत असल्याचे अमिर खान ( Aamir Khan ) प्रोडक्शन हाऊसने आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल द्वारे कळवले आहे. यामुळे आता प्रदर्शनाच्या तारखेबाबतच्या अफवांना फाटा मिळाला आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महावीर जयंती आहे. यामुळे गुरुवारी नॅशनल हॉलीडे दिवशी हा चित्रपट रीलीज केला जाणार आहे. तसेच १४ तारखेला संपूर्ण उत्तर भारतात ‘बैसाखी’ त्योहार साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून हा सिनेमा १४ एप्रिल रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

१९९४ साली आलेला हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा रिमेक ‘लालसिंग चड्ढा’ असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटातील व्यक्तीरेखेवर अमिर खान याने प्रचंड मेहनत घेतली आहे. अद्वेत चंदन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर प्रितम यांचे संगित या चित्रपटाला लाभले आहे. देशातील तब्बल १०० हून अधिक शहरात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.

 

Back to top button