Lokshahir Pathte Bapurao : ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला | पुढारी

Lokshahir Pathte Bapurao : ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव’ (Lokshahir Pathte Bapurao) व ‘पठ्ठेे बापूरावांच्या शोधात’ या पुस्तकावर आधारित ‘लोकशाहीर पठ्ठेे बापूराव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Lokshahir Pathte Bapurao)

लावणीतील शृंगाराचे सौंदर्य खुलवण्याचे काम पठ्ठे बापूराव यांनी केले. आपल्या पहाडी आवाजात तमाशाला वेगळे वळण दिले. आपल्या हयातीत त्यांनी दोन लाखाहून अधिक लावण्या लिहिल्या. याबद्दल कोल्हापूरच्या शाहू महाराज यांनी सोन्याचे कडे देऊन त्यांचा गौरव केला. आजच्या पिढीसमोर ‘पठ्ठेे बापूराव’ हे चित्रपटाच्या माध्यमातून येत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलिंद संकपाळ यांनी केले आहे. निर्मिती कांतीलाल भोसले, नीलेश देशमुख व रोहन गोडांबे यांची आहे.

Back to top button