राजकुमार हिराणींच्या चित्रपटात वरुण - पुढारी

राजकुमार हिराणींच्या चित्रपटात वरुण

पुढारी ऑनलाईन

दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या आगामी चित्रपटात अभिनेता वरुण धवन दिसणार आहे. अर्थात, या चित्रपटाची निर्मिती हिराणी करत असून दिग्दर्शन त्यांचे साहाय्यक करण नार्वेकर करणार आहे. ‘मेड इन इंडिया’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. या चित्रपटाची कथा खर्‍याखुर्‍या घटनांवर आधारित आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत या चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊ शकते.

Back to top button