अभिनेता चंद्रचूड सिंह ‘रालोद’कडून लढणार? | पुढारी

अभिनेता चंद्रचूड सिंह ‘रालोद’कडून लढणार?

अलीगड : वृत्तसंस्था

बॉलीवूड अभिनेता चंद्रचूड सिंह लवकरच सक्रिय राजकारणात उतरणार आहे. उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यातील बरौली विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील, असे जवळपास ठरले आहे. जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकदल पक्षाचे ते उमेदवार असतील. अर्थात, पक्षाने अद्याप त्यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. चंद्रचूड हे मूळचे अलीगडचे असून त्यांची आई राजघराण्यातून होती.

Back to top button