पी. व्ही. नरसिंह राव यांच्यावर वेबसीरिज | पुढारी

पी. व्ही. नरसिंह राव यांच्यावर वेबसीरिज

पुढारी ऑनलाईन

निर्माता-दिग्दर्शक प्रकाश झा हे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या जीवनावर आधारित वेबसीरिज बनविणार आहेत. ‘हाफ लायन’ असे या सीरिजचे नाव असणार आहे. विनय सीतापती यांच्या पुस्तकावर आधारित हा बायोग्राफिकल ड्रामा असून हिंदीसह तेलगू, तमिळ या भाषांमध्ये ही सीरिज 2023 मध्ये रीलिज होणार आहे. नरसिंह राव 1991 ते 1996 या काळात देशाचे पंतप्रधान होते.

दिग्दर्शक प्रकाश झा म्हणाले की, नरसिंह राव यांनीच भारताला आर्थिक स्वातंत्र्य दिले होते. आर्थिक सुधारणांचे श्रेय त्यांनी कधीही घेतले नाही. उलट तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी आणि काँग्रेसला हे श्रेय त्यांनी दिले. त्यांचे काम या सीरिजमधून सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे.

Back to top button