भूमी पेडणेकर : ‘द लेडी किलर’ला मिळाली हीरोईन | पुढारी

भूमी पेडणेकर : ‘द लेडी किलर’ला मिळाली हीरोईन

पुढारी ऑनलाईन

अर्जुन कपूरच्या आगामी ‘द लेडी किलर’साठी अखेर हीरोईन मिळाली आहे. गेले काही दिवस या चित्रपटासाठी नायिकेचा शोध सुरू होता. आता अभिनेत्री भूमी पेडणेकर या चित्रपटात अर्जुनच्या अपोझिट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अजय बहल या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. विशेष म्हणजे अर्जुन आणि भूमी यांच्या टॅलेंट मॅनेजमेंटचे काम यशराज फिल्म्सची कंपनी यशराज टॅलेंटस्तर्फे पाहिले जाते.

मानसिकद‍ृष्ट्या विचित्र असलेल्या मुलीच्या प्रेमात पडणार्‍या तरुणाची भूमिका अर्जुनने या चित्रपटात साकारली आहे. दरम्यान, आगामी काळात अर्जुन कपूर मोहित सुरी दिग्दर्शित ‘एक व्हिलन-2’ आणि विशाल भारद्वाजचा मुलगा आसमान दिग्दर्शित ‘कुत्ते’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

Back to top button