समांथा : ती म्हणते, ‘सलमान आणि मी केवळ…’ | पुढारी

समांथा : ती म्हणते, 'सलमान आणि मी केवळ...'

पुढारी ऑनलाईन

कुठल्याही रिलेशनशिपबाबत चर्चा सुरू झाल्यावर हमखास कानावर पडणारे हे वाक्य. आताही अशाच एका चर्चेनंतर मॉडेल समांथा लॉकवूडने या वाक्यातून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. बी टाऊनमध्ये गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि समांथा लॉकवूड यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू आहेत. नुकत्याच समांथा लॉकवूडने दिलेल्या मुलाखतीत तिला सलमानसोबतच्या रिलेशनशिपबाबत प्रश्न विचारला गेला.

समांथा म्हणाली की, लोक खूप बोलतात. काहीही नसले तरी खूप काही बोलले जाते. मी सलमानला भेटली आहे. तो माझा चांगला मित्र आहे. आणि एक चांगला माणूसही आहे. याबाबत केवळ एवढेच सांगण्यासारखे आहे. मला कळत नाही, लोकांना एवढ्या कल्पना सूचतात कशा? सलमानआधी मी हृतिक रोशनला भेटले होते. मात्र, हृतिक आणि माझ्याबाबत अशा काही बातम्या आल्या नाहीत. दरम्यान, समांथा सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीतही दिसली होती. तसेच तिचा आवडता बॉलीवूड चित्रपट ‘सुलतान’ असल्याचेही तिने सांगितले.

Back to top button