Sonalee Kulkarni : ‘पागल करते तुझी मोरणीशी चाल’..सोनालीच्या पैठणीत उफ्फ अदा

Sonalee Kulkarni
Sonalee Kulkarni
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क – मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी हिने पैठणी साडीतील सुंदर अदा असणारे फोटो शेअर केले आहेत. (Sonalee Kulkarni ) सुंदर पैठणी नेसून मोकळ्या केसांमध्ये तिने व्हिडिओदेखील शूट केला आहे. (Sonalee Kulkarni)

काही फोटो शेअर करताना सोनालीने एक गुलाबाच्या फुलाचे ? इमोजी शेअर केले आहेत. तर व्हिडिओ शेअर करताना तिने No caption needed! अशी कॅप्शन दिली आहे.

कपाळावर तंद्रकोर, नाकात नथणी, मोकळे केस, तिचे सुंदर डोळे, मोतीहीर, कानात झुमके, हातात सिंगल बांगड्या असा तिचा शृंगार उठावदार दिसतो. तिच्या अदा नेहमीच घायाळ करणाऱ्या अशतात. या ऑरेंज कलर पैठणी साडीतील फोटो, व्हिडिओमध्येही तिचा लूक अप्रतिमचं दिसतो.

काय म्हणताहेत फॅन्स?

तिच्या या लूकवर अनेक नेटकऱ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये सुंदर अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं आहे-खुप सुंदर फोटोग्राफी… पण खरं तर हो फोटो ऐवढे सुंदर कसे काय…. फोटोग्राफर ची कला….ते तर आहेच…पण समोर जर अप्सरा असेल तर… फोटो कसेही काढा ते सुंदरच येणार…??❤️❤️, आणखी एकाने लिहिलंय-??❤️?? looking so nice saree colour.

तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय- Awesome looking looking mam❤️?❤️, देखणी ?, But saree's colour is orange ??, Very beautiful and elegant, सुंदर दिसताय खूप ??, नाजुका ❤️ खूप गोड ❤️ सुंदरी ❤️ अशाही कॉमेंट्स तिला येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news