

पुढारी डिजिटल : सोशल मीडिया वापरत नाही अशी व्यक्ती अलीकडच्या काळात शोधून सापडणार नाही. पण या सोशल मिडियाचा वापर आता केवळ संवादापुरता किंवा शेअरिंगपुरता केला जात नाहीये. अनेकदा समाजविघातक गोष्टींसाठीही सोशल मीडिया वापरला जातो आहे. इंटेलिजन्स ब्युरोच्या विशेष संचालकांनी याबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी सोशल मीडिया चॅट रूमचा वापर केला जात आहे. 49 व्या AIPSC च्या सहाव्या सत्रात बोलताना त्यांनी ही बाब विषद केली. कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलिसांवर परिणाम करणाऱ्या आंदोलनांवर असलेल्या सोशल मीडियाच्या प्रभावाविषयी ते बोलत होते.
"पोलिसिंग इन अमृत काल" या थीमसह उत्तराखंड पोलिसांनी 7 ऑक्टोबर रोजी डेहराडून येथील वन संशोधन संस्थेत (FRI) 49 व्या AIPSC चे आयोजन केले होते. यात बोलताना आयबी चे अधिकारी म्हणतात, " समाजकंटक फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडिया चॅटरूमचा वापर दहशवादीभरतीसाठी करत आहेत.' देशाच्या अंतर्गत सुरक्षेला खिंडार पाडण्यासाठी बाह्यशक्तींकडून सोशल मिडियाचा वापर केला जात आहे."
मेक इन इंडिया योजनेंतर्गत पोलिसांच्या आधुनिकीकरणात उच्च आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केलेली स्मार्ट शस्त्रे आणि इतर उपकरणे समाविष्ट करण्यावर त्यांनी भर दिला.
हेही वाचा :