Smriti Mandhana New Car : दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर स्मृती मानधनाने खरेदी केली नवी रेंज रोव्हर कार

Smriti Mandhana New Car : दिवाळीच्या शुभ मुहुर्तावर स्मृती मानधनाने खरेदी केली नवी रेंज रोव्हर कार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने लँड रेंज रोव्हर ही नवी कार खरेदी केली आहे. ही नवी कार खरेदी केलेला फोटो तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. तीने खरेदी केलेली रेंज रोव्हर इव्हॉक ही भारतातील कार चाहत्यांच्या पसंतीची आणि महागडी कार आहे. तिने कार खरेदी केल्यानंतरचा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे. (Smriti Mandhana New Car)

स्मृतीने खरेदी केलेली SUV कार ही सिलिकॉन सिल्व्हर शेडमधील भारतातील सर्वात टॉपचे कार मॉडेल आहे. तिची नवी अलिशान रेंज रोव्हर ही भारतात हायब्रिड तंत्रज्ञानासह पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्मृतीने पोस्ट केलेल्या फोटोंमधील या कारचा इंजिन पर्याय कोणता आहे याबाबत तिने माहिती दिलेली नाही. पण तिच्या या व्हायरल फोटोंवर चाहत्यांच्या खूप कमेंट्स आलेल्या आहेत.

Smriti Mandhana New Car : जाणून घ्या रेंज रोव्हर इव्हॉक कारचे फिचर्स

लँड रेंज रोव्हर इव्होक 2020 साली अपडेट करण्यात आली आहे. यामध्ये नवीन ग्रिल, स्वीप्टबॅक बोनेट आणि विशिष्ट एलईडी डीआरएल उपलब्ध आहेत. याशिवाय फ्लश डोअर हँडल आणि नवीन अलॉय व्हिल्स देण्यात आली आहेत.

रेंज रोव्हर इव्होक Pivi, Apple Carplay आणि Android Auto सारख्या फिचर्संनी सुसज्ज आहे. कारच्या आतील फिचर्सपैकी टचस्क्रीन हे एक हे खूप चर्चेतील तंत्रज्ञान आहे. 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, रेंज रोव्हर इव्होक R‑डायनॅमिक SE स्पोर्ट्स प्रीमियम एलईडी हेडलाइट्सने सुसज्ज आहे. ड्रायव्हर मेमरी सीट्स आणि 48.26 सेमी (19) अलॉय व्हील. यात 3D सराउंड कॅमेरा देखील आहे.

खराब एअरबॅगमुळे कंपनीने परत मागविली होते नवे कार मॉडेल

रेंज रोव्हर इव्होकचे आतील भाग 3D सराउंड कॅमेरा, PM 2.5 फिल्टरसह केबिन एअर आयनीकरणाने सुसज्ज आहेत. यात नवीन Piwi Pro इंफोटेनमेंट सिस्टम आणि फोन सिग्नल बूस्टरसह वायरलेस चार्जिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे. लँड रेंज रोव्हर इव्होकच्या सेफ्टी फीचर्सबद्दल सांगायचे तर, यात ऑटोमॅटिक अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टम, stability control, फ्रंट एअरबॅग, साइड एअरबॅग, ओव्हरहेड एअरबॅग मिळतात. एवढ्या सगळ्या फिचर्सनी सुसज्ज असलेली हे कार मॉडेल कंपनीने फेब्रुवारी 2022 मध्ये खराब एअरबॅग लाईट असल्याने परत मागवले होते.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news