

जकार्ता – ऑपरेशन करून पाय काढला जाण्यासाठीचे आवश्यक वैद्यकीय ज्ञान माणसाला किमान 31 हजार वर्षांपूर्वी महिती होते, हे दर्शवणारा पुरावा संशोधकांना मिळाला आहे. इंडोनेशियात पुरातत्त्व संशोधकांना एक मानवी सांगाडा (Indonesia Skeleton) मिळाला असून या सांगाड्याचा एक पाय कापण्यात आल्याचे दिसून आले आहे. हा सांगाडा एक प्रौढाचा असून त्याचा पाय लहानपणी कापला होता, असे संशोधकांनी म्हटले आहे.
नेचर या जर्नलमध्ये हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. बोर्निओ येथील एका गुहेत हा सांगाडा मिळाला आहे. हा सांगाडा सुस्थितीत असून त्याचा फक्त एक पाय नसल्याचे दिसून आले आहे. संशोधकांनी विश्लेषण केले असता या सांगाड्याच्या पायाचे हाड काळाच्या ओघात किंवा अपघाताने बेपत्ता झाले नसून ते कापून काढण्यात आल्याचे दिसून आले.
पाय काढल्यानंतर हा व्यक्ती 69 वर्षं जगला होता, आणि या व्यक्तीच्या पायाचा मगरीसारख्या एखाद्या प्राण्याने चावा घेतला असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वीची अशा प्रकारची नोंद ही फ्रान्समधील आहे. फ्रान्समध्ये शस्त्रक्रिया करून हात काढण्यात आलेला एक सांगाडा सापडला होता, हा सांगाडा 7 हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे निष्पन्न झाले होते.
हेही वाचा