Fateh Movie : अरिजित सिंगने ‘फतेह’साठी दिला ‘जादुई आवाज’, सोनू सूद म्हणतो…

arijit singh
arijit singh
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'फतेह'साठी तुमचा जादुई आवाज दिल्याबद्दल सोनू सूदने अरिजित सिंगचे आभार मानले. सोनू सूदचे चाहते अभिनेत्याच्या आगामी ॲक्शनर 'फतेह' साठी (Fateh Movie) उत्सुक असताना आता फतेहबद्दल आणखी एक खास गोष्ट समोर आली आहे. सोनू सूदने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना चित्रपटाबद्दल अजून एक अपडेट दिली आहे. "फतेह" साठी "जादुई आवाज" दिल्याबद्दल त्यांनी अरिजित सिंगचे आभार मानले आहे आणि यातून आता हे स्पष्ट होतंय की अरिजित सिंग च्या जादुई गाण्याची झलक फतेहमध्ये दिसणार आहे. (Fateh Movie )

अभिनेत्याने गायकाचा फोटो शेअर केला आणि लिहिले " फतेहसाठी तुमचा जादुई आवाज दिल्याबद्दल धन्यवाद arijitsingh"
सोनू सूद त्याच्या दिग्दर्शित पदार्पणाच्या 'फतेह' च्या रिलीजसाठी उत्सुक आहे. चाहते केवळ हॉलिवूडच्या लार्जर-दॅन-लाइफ शैलीतील ॲक्शन-पॅक थ्रिलरचीच नव्हे तर अरिजित सिंगच्या गाण्याचीही वाट पाहत आहेत.

शक्तीसागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज निर्मित हा चित्रपट सायबर क्राईमच्या गुंतागुंत आणि आव्हानांभोवती फिरतो. यात काही चित्तथरारक ॲक्शन सीक्वेन्सदेखील दाखवण्यात येणार आहेत जे हॉलिवूड स्टंट तज्ज्ञ ली व्हिटेकर यांच्या देखरेखीखाली केले गेले आहेत. 'फतेह'चे शूटिंग भारत, अमेरिका, रशिया आणि पोलंडसह जागतिक लोकेशन्सवर झाले आहे. हा चित्रपट यावर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news