arijit singh
arijit singh

Arijit Singh : गरीब लोकांसाठी अरिजीत सिंह हॉस्पिटल उभारणार, मोफत मिळणार उपचार

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अरिजीत सिंह गरीब लोकांसाठी हॉस्पिटल बांधणार आहे, जिथे लोकांना मोफत उपचार मिळतील. तो हे हॉसिपटल पश्चिम बंगालमधील जंगीपूर या ठिकाणी बांधणार आहे. (Arijit Singh ) दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत की, अरिजीतला हॉस्पिटल बांधण्यासाठी प्रत्येक प्रकारची मदत करण्यात यावी. हे हॉस्पिटल मुर्शिदाबाद जिल्ह्यात असणार आहे. (Arijit Singh )

स्वखर्चाने हॉल्पिटल उभारणार असल्याची घोषणा अरिजीतने केली होती. ममता म्हणाल्या की, अरिजीत स्वत:जियागंज येथील राहणारा आहे. जंगीपूरमध्ये तो हॉस्पिटल उभारत असताना प्रशासनाकडून कोणतीही उडचण येता कामा नये. ममता यांनी तृणुमूल नेते खलीलुर रहमन यांनाही निर्देश दिले की, विशेषपणे, त्यांनी अरिजीत यांना सर्वोतोपरी मदत करावी.
जंगीपूरमध्ये राज्य सरकारने आधीपासून एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news