Yodha Trailer : योद्धामध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा अनोखा अवतार, तगडी ॲक्शनबाजी (Video)

sidharth malhotra
sidharth malhotra
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिद्धार्थ मल्होत्राची तगडी ॲक्शनबाजी असलेला चित्रपट योद्धाचे ट्रेलर रिलीज झाले आहे. सिद्धार्थची ॲक्शन पाहून शेरशाह चित्रपटाची आठवण नक्कीच येईल. (Yodha Trailer) देशभक्तीपर आधारित हा चित्रपट आहे. योद्धा ट्रेलरची सुरुवात एका विमान हायजॅकने होते. यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आपल्या ॲक्शन अंदाजात दिसतो. २ मिनिट ४८ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये योद्ध्याची कहाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. योद्धाच्या ट्रेलरमध्ये अनेक जागी सिद्धार्थ मल्होत्रा ॲक्शन करताना दिसणार आहे. (Yodha Trailer)

ॲक्शन हिरो म्हणून सिद्धार्थ मल्होत्रा शानदार दिसत आहे. योद्धा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा ट्रेलर फॅन्सच्या पसंतीस उतरत आहे. सोबतच नेटकरी कॉमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. योद्धामध्ये राशि खन्ना, दिशा पटानी मुख्य भुमिकेत आहेत. सागर आम्बरे आणि पुष्कर ओझा यांचे दिग्दर्शन आहे.

अनेकवेळा बदलली रिलीज डेट

योद्धाची पहिली रिलीज डेट ७ जुलै २०२३ होती. त्यानंतर रिलीज डेट बदलून १५ सप्टेंबर २०२३ करण्यात आली. हीदेखील तारीख नंतर बदलण्यात आली. करण जोहरने सांगितले की, ८ डिसेंबर २०२३ रोजी मेरी क्रिसमस सोबत हा चित्रपट रिलीज होईल. नंतर ही देखील तारीख बदलण्यात आली. आता हा चित्रपट १५ मार्च, २०२४ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल.

ॲक्शन हिरो म्हणून सिद्धार्थ मल्होत्रा शानदार दिसत आहे. योद्धा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा ट्रेलर फॅन्सच्या पसंतीस उतरत आहे. सोबतच नेटकरी कॉमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. योद्धामध्ये राशि खन्ना, दिशा पटानी मुख्य भुमिकेत आहेत. सागर आम्बरे आणि पुष्कर ओझा यांचे दिग्दर्शन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news