Shubhman Gill ठरला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज
पुढारी ऑनलाईन डेस्क : एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना धर्मशालाच्या मैदानावर खेळवण्यात येत आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंतर फलंदाजीसाठी उतरेलल्या न्यूझीलंडने भारतासमोर २७४ धावांचे आव्हान ठेवले आहे. दरम्यान, न्यूझीलंडच्या २७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शुभमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २,००० धावा पूर्ण केल्या आहेत.
शुभमन गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २,००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ३८ डावात २ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशीम आमला याच्या नावावर होता. त्याने २ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ४० डावात ही कामगिरी केली हाेती. (Shubhman Gill)
वन-डेमध्ये जलद २००० धावा करणारे फलंदाज (कंसात इनिंग्ज )
- शुभमन गिल – ( ३८)
- हाशीम आमला – (४०)
- झहीर आब्बास – ( ४५)
- केविन पीटरनस – ( ४५)
- बाबर आझम – (४५ )
मोहम्मद शमीचा धमाका, मोडला दिग्गज अनिल कुंबळेचा विक्रम
२०२३ च्या विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात मोहम्मद शमीने दमदार पुनरागमन केले आहे. त्याने १० षटकांमध्ये ४५ धावा देत ५ विकेट्स पटकावल्या आहेत. शमी विश्वचषकात भारतासाठी तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. अनिल कुंबळे यांनी विश्वचषक स्पर्धेत ३१ बळी घेतले आहेत. मोहम्मद शमीच्या नावावर विश्वचषक स्पर्धेत ३६ बळींची नोंद झाली आहे. शमीने विश्वचषक स्पर्धेत १२ सामने खेळत ३६ विकेट्स पटकावल्या आहेत.
विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत जहीर खान आणि जवागर श्रीनाथ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनी विश्वचषकात प्रत्येकी ४४ विकेट्स पटकावल्या आहेत. या यादीत मोहम्मद शमी ३६ विकेट्स पटकावत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. (Shubhman Gill)

