

ग्रेटर नोएडा : येथील गौतम बुद्ध विद्यापीठात सुरू असलेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या शुभम तोडकर याने 61 किलो गटात सुवर्णपदक मिळवले.
आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड झालेल्या शुभमने 259 (115+144) किलो वजन उचलले. शुभमने सुवर्णपदक मिळवले असले तरी या गटात त्याला सर्वश्रेष्ठ कामगिरी नोंदवता आली नाही. यामध्ये भारताच्याच सिद्धांत गोगई याने ज्युनिअर गटातून बाजी मारली. सिद्धांतने 260 किलो (112+148) वजन उचलले.