पुणे : पुन्हा एकदा निनादले ‘ॐ नमस्ते गणपतये…’ चे सूर; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (व्हिडिओ)

पुणे : पुन्हा एकदा निनादले ‘ॐ नमस्ते गणपतये…’ चे सूर; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (व्हिडिओ)
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे ३१ हजार महिलांच्या मुखातून अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते. कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी अनुभविला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३१ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली.

प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल, परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे, ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव यावेळी उपस्थित होते. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा ३५ वे वर्ष होते. अनुराधा पौडवाल म्हणाल्या, जगद्गुरू शंकराचार्य रचित सौंदर्य लहरी चे पठण मी केले आहे. धर्म बळकट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे पठण आपण सर्वानी एकत्रितपणे नक्की करूया, असेही त्यांनी सांगितले. डॉ. प्रियांका नारनवरे म्हणाल्या, प्रत्येक घरामध्ये असलेल्या स्त्री शक्ती मुळे चांगले संस्कार घडत आहेत. दगडूशेठ गणपती ट्रस्ट उत्तम कार्य करीत असून यामुळे इतरांना समाजासाठी काम करण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल.

पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले. ट्रस्टच्या जय गणेश पालकत्व योजनेतील विद्यार्थ्यानी स्वातंत्र्य सेनानींच्या माहितीचे फलक हातात घेऊन त्यांना अभिवादन केले. तसेच सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी फोडताना दहीहंडीला काही वेळ शौर्याने लटकत एकटयाने दहीहंडी फोडणा- या प्रथमेश कारळे या कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळाच्या गोविंदास ट्रस्टतर्फे सन्मानचिन्ह, महावस्त्र व २५ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे ३१ हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news