Shraddha Murder Case : आफताबला घेवून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर सशस्त्र हल्ला (Video)

Shraddha Murder Case : आफताबला घेवून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर सशस्त्र हल्ला (Video)
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याला घेवून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर सोमवारी संध्याकाळी मधुबन चौकानजीक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.हल्लेखोरांनी हातात तलवार घेऊन पोलीस व्हॅन चा दरवाजा उघडत आफताब ला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला.परंतु, प्रसंगावधान राखत पोलीस कर्मचाऱ्यांनी पिस्तूल काढल्याने अनुचित प्रकार टळला .(Shraddha Murder Case)

आफताबची पॉलीग्राफ टेस्ट करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीत (एफएसएल) आणण्यात आले होते.लॅबमधून पुन्हा तिहाड कारागृहात घेवून जात असतांना असतांना हल्लेखोरांनी घोषणाबाजी करीत त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

या हल्ल्याचा एक व्हिडिया व्हायरल झाला असून हल्लेखोर आफताबला घेवून जाणाऱ्या पोलीस व्हॅनमागे तलवार घेवून पळत असल्याचे दिसून येत आहे. सशस्त्र हल्लेखोर आफताबला व्हॅनबाहेर उतारण्याच्या प्रयत्नात होते. पुर्ण योजना आखून हल्लेखोर आले होते,असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. याप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून आरोपींनी ते हिंदू सेनेचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे.आरोपींच्या वाहनातून काही शस्त्रे देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे.

हिंदू सेनेचा सदस्य असल्याचा हल्लेखोरांचा दावा(Shraddha Murder Case) 

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला याला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर तलवारीने सज्ज असलेल्या दोन जणांनी हल्ला केला. हल्लेखोर स्वतःला हिंदू सेनेचे सदस्य असल्याचे सांगत आहेत.

पोलिसांनी काढली बंदुक (Shraddha Murder Case)

फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या कार्यालयाबाहेर आल्यावर आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर तलवारधारी तरुणांनी हल्ला केला. यावेळी पोलिसांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने पिस्तुल बाहेर काढली होती. तेव्हा देखील हल्लेखोरांनी स्वत:ला रोखले नाही. ते पोलिसांना न जुमानता व्हॅनवर हल्ला करीत होते. पोलिसांनी घटनेचे गाभिर्य ओळखत घटना स्थळावरुन पोलिस व्हन ताबडतोब हलवली.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news