

पुढारी ऑनलाईन: थायलंडची राजधानी बँकॉक येथील मॉलमध्ये आज (दि.३) गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात तिघेजण ठार, तर ३ जण जखमी झाले आहेत. या घटनेतील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचेही बँकॉक पोलिसांनी सांगितले आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Shooting in Bangkok)
बँकॉक येथील एका लक्झरी मॉलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी एका किशोरवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. सियाम पॅरागॉन असे या १४ वर्षीय किशोरवयीन मुलाचे नाव असून, पोलिसांकडून त्याची चौकशी करण्यात येत आहे. (Shooting in Bangkok)