छायाचित्र : शिवरी नारायण मंदिरातील सीता. छायाचित्र अधिकार : डॉ. सुरुचि पांडे
Latest
नवरात्रौत्सव २०२३ : सीता : जगन्मातेचंच एक रूप
भूमिकन्या सीता हे जगन्मातेचंच एक रूप. मानवी रूपात प्रकट होऊन जनमानसात जिव्हाळ्याचं स्थान मिळवलेली ही एक अनोखी देवी. छत्तीसगडमध्ये तपस्विनी शबरी आणि सीता-राम-लक्ष्मण यांचं मंदिर आहे. चौदा वर्षांच्या वनवासातील दहा वर्षांहून अधिक काळ हे तिघे छत्तीसगडच्या भूमीत वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्याचे संस्कृत साहित्यातून दिसते. 'शिवरी नारायण' या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. प्रादेशिक भाषेनुसार शिवरी म्हणजे शबरी. सीता श्रीरामांची सहधर्मिणी; त्याचबरोबर ती पृथ्वी आणि निसर्गाशी नातं असलेली देवता आहे. वनवासाच्या काळात, 'विनाकारण जीवहत्या करू नये' हे सांगणारी सीता वाल्मीकी रामायणात भेटते. ऋग्वेदात भूमीला उद्देशून 'सीता' हा शब्द येतो. प्राचीन काळात कृषिविद्येशी संबंधित असणारी 'सीता' ही महत्त्वाची देवता होती.

