शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर तुकाराम तथा डी. टी. शिर्के यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाचे सुहास पेडणेकर यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाल 10 सप्टेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभारी कार्यभार डॉ. शिर्के यांच्याकडे सोपविण्यात निर्णय झाला आहे. डॉ. शिर्के यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठात प्रभारी कुलसचिव, प्रकुलगुरु या पदावर काम केले आहे.

शिवाजी विद्यापीठाचे 13 वे कुलगुरू म्हणून डॉ. डि. टी. शिर्के सध्या कार्यरत आहेत. ते मुळचे हातकणंगले तालुक्‍यातील वाठार तर्फे वडगाव येथील आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात एम.एस.सी केले. त्यानंतर त्यांनी याच विद्यापीठातून एम.फील आणि पी.एचडी केली. त्यानंतर ते याच विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विभागप्रमूख, प्रभारी कुलसचिव, प्र-कुलगुरू या पदांवर त्यांनी काम केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news