यशवंत जाधवांच्या डायरीत मातोश्रीला २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख!

यशवंत जाधवांच्या डायरीत मातोश्रीला २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख!
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांवरुन प्राप्तीकर विभागाने मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढत जाताना दिसत आहेत. त्यांच्या डायरीमध्ये त्यांनी केलेल्या व्यवहारांची नोंदी आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यशवंत जाधव यांच्या सापडलेल्या डायरीत मातोश्रीला २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे या मातोश्री कोण याची चर्चा सुरु झाली आहे. यशवंत जाधव यांनी मातोश्री म्हणजेच आई म्हटले आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव मातोश्री आहे. या व्यवहाराबाबत आयकर विभागाला संशय असल्याने तपास सुरु केला आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्यासह त्यांचे जवळचे सहकारी आणि मुंबई महानगरपालिकेसाठी कंत्राटे घेणारे काही कंत्राटदार अशा तब्बल ३५ हून अधिक ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये तब्बल १३० कोटी रुपये किंमतीच्या तीन डझन स्थावर मालमत्तांचे तपशील आणि पालिका कंत्राटदारांनी तब्बल २०० कोटींचे उत्पन्न लपवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राप्तीकर विभागाने या कारवाईत २ कोटींच्या रोख रकमेसह सुमारे दीड कोटींचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

प्राप्तीकर विभागाने २५ फेब्रुवारीच्या पहाटेपासून छापेमारी करत शोध मोहीम राबविली होती. यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरासह कार्यालये, निकटवर्तीय आणि पालिकेशी संबंधित पाच कंत्राटदार अशा ठिकाणी शोध मोहीम राबविली. चार दिवस ही कारवाई सुरु होती. प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यांनी या कारवाईत महत्वपूर्ण कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक, डिजीटल दस्तऐवज जप्त केला. यात कंत्राटदार आणि यशवंत जाधव व निकटवर्तीयांमध्ये जवळचे संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्राप्तीकर विभागाला १३० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या ३ डझन स्थावर मालमत्तांचे तपशील सापडले आहेत. यात जाधव यांच्यासह त्यांचे सहकारी किंवा बेनामीदारांच्या नावावर घेतलेल्या मालमत्तांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय हवाला व्यवहारात त्यांचा सहभाग असल्याचे आणि अवैधरित्या कमावलेले पैसे काही परदेशी अधिकारक्षेत्रात पाठवल्याचे पुरावे, कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी रोख पावत्या आणि देयके यांचा तपशील असलेली कागदपत्रे आणि एक्सेल फायली देखील सापडल्या आहेत. प्राप्तीकर विभागाने हा दस्तऐवज जप्त केला आहे, ज्यांची नोंद खात्याच्या नियमित पुस्तकांमध्ये नाही.

कंत्राटदारांच्या बाबतीत, जप्त केलेल्या कागदपत्रांवरून खर्च वाढवून करपात्र उत्पन्न मोठ्या प्रमाणात दडपण्यासाठी त्यांनी अवलंबलेली कार्यपद्धती उघड झाली आहे. यासाठी उप-कंत्राट खर्चासाठी जास्त कंपन्या दाखवून पावत्या तयार करणे आणि खोट्या खर्चाचा दावा करण्यात आला आहे. काही व्यवहारांमधून असे दिसून येते की या कंपन्यांकडून रोख रक्कमसूद्धा काढण्यात आली आहे. या रकमेचा वापर कंत्राटे देण्यासाठी आणि मालमत्तांमधील गुंतवणुकीसाठी बेहिशेबी पैसे देण्यासाठी केला गेला आहे. या गैरप्रकारांद्वारे कंत्राटदारांनी २०० कोटी रुपयांचे उत्पन्न दडवल्याचे प्राप्तीकर विभागाच्या प्राथमिक तपासात आढळले आहे.

प्राप्तीकर विभागालाही सुमारे एक डझन बनावट कंपन्यांची माहितीसूद्धा मिळाली आहे. त्याच आधारे प्राप्तीकर विभागाने याच्याशी संबंधीत बँक खाती, 10 बँक लॉकरवर निर्बंध आणत तपास सुरु असल्याचे प्राप्तीकर विभागाने सांगितले आहे.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news