

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) अखेर १०२ दिवसांच्या कैदेनंतर जामिनावर आर्थररोड कारागृहातून बाहेर पडले आहेत. विशेष पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत यांना बुधवारी जामीन मंजूर केला. यावेळी ईडीने जामीन आदेशच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. पण, कोर्टाने ईडीची मागणी फेटाळत राऊत यांना जामीन दिला. त्यानुसार संजय राऊत हे आर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले आहेत. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात संजय राऊत यांचे स्वागत केले. राऊत यांच्या बाहेर येण्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असल्याचे पहाण्यास मिळाला.
तब्बल १०२ दिवसांनंतर संजय राऊत (Sanjay Raut) कारागृहातून बाहेर पडत आहेत. आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. यावेळी कारागृहाबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करण्यात आली. उद्धव ठाकरे गटाचे मोठे नेते संजय राऊत यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने ३१ जुलैच्या मध्यरात्री अटक केली होती. गेले १०० दिवस ते आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सहभाग असल्याचा आरोप केला आहे. राऊतांच्या वकिलांनी पत्राचाळ घोटाळ्याशी त्यांचा काही संबंध नाही नसल्याचा युक्तीवाद केला. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज बुधवारी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
संजय राऊत हे तुरुंगातून बाहेर येत आहेत ही खूप आनंदाची बाब आहे. कुटुंबियांसह कार्यकर्त्यांना देखिल आनंद होत आहे. त्यांना जामीन मिळताच अनेक फोन येत आहेत. अनेकजण अभिनंदन करत आहेत. हे सर्व लोक संकटाच्या काळात राऊत कुटुंबियांसह उभे राहिले आणि आज कारागृहा बाहेर देखिल अनेक जण त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले आहेत याचा खूप आनंद होत आहे.
संजय राऊत कारागृहा बाहेर आले आहेत आहेत. ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या जल्लोषात आपल्याचे नेत्याचे स्वागत केले. यावेळी अनेक महिला कार्यकर्त्यांनी आज आमचा वाघ बाहेर येत आहे म्हणत आजचा दिवस आमच्यासाठी दिवाळीचा दिवस आहे. खऱ्या अर्थाने आज आम्ही दिवाळी साजरी करणार अशी प्रतिक्रीया अनेक कार्यकर्त्यांनी तुरुंगाबाहेर जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी दिली.
संजय राऊत यांच्या जामिनाला स्थगिती मिळावी, अशी मागणी करणारा अर्ज ईडीने उच्च न्यायालयात केला हाोता. यावर आज ( दि. ९ ) सुनावणी झाली. या प्रश्नी दहा मिनिटांमध्ये निर्णय देणे चुकीचे ठरेल, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने संजय राऊतांच्या जामिनाला स्थगिती देण्यास नकार दिला. या प्रकरणी गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. (Patra Chawl land scam ) मनी लाँड्रिंग प्रकरणात आज विशेष पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला होता. 'पीएमएलए' कोर्टाने खासदार संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या जामीन आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची ईडीची मागणी फेटाळली होती. यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
अधिक वाचा :